रुग्णांसाठी माहिती पत्रक
Deep Brain Stimulation (DBS) म्हणजे काय?
डीबीएस ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये दोन इलेक्ट्रोडचे रोपण केले जाते. छातीच्या त्वचेखाली ठेवलेला एक पेसमेकर इलेक्ट्रोडमधून मेंदूला संप्रेरणा पाठवतो ज्यामुळे स्नायूंचा थरकांप, शरीराचा कडकपणा आणि मंद झालेल्या हालचाली सुधारतात.
डीबीएस कोणकोणत्या आजारांमध्ये उपयोगी ठरते?
आतापर्यंत, ह्या शस्त्रक्रियेला Essential tremor, Parkinson’s disease, Dystonia, Epilepsy, Obsessive Compulsive Disorder ह्या आजारांसाठी मान्यता मिळाली आहे.
डीबीएस शस्त्रक्रिया माझी सर्व लक्षणे दूर करू शकते का?
डीबीएस शस्त्रक्रिया केल्याने सामान्यत:, लिवोडोपाला प्रतिसाद देणारी लक्षणे सुधारतात, जसे की: कंप (tremor), अनावश्यक हालचाली (dyskinesias), मंदपणा (slowness) आणि स्नायूंचा कडकपणा (rigidity).
डीबीएस ह्या लक्षणांमध्ये उपयोगी पडत नाही: बद्धकोष्टता, स्मरणशक्ती किंवा आकलनशक्तीशी निगडित लक्षणे, नैराश्य किंवा भीती, झोपेच्या किंवा संतुलनाच्या समस्या
ही शस्त्रक्रिया केल्याने मला काय फायदे होतील?
ही शस्त्रक्रिया केल्याने तुम्हाला पुढील फायदे होऊ शकतात:
· दैनंदिन क्रिया करण्याची क्षमता सुधारते.
· लक्षणे कमी झाल्यामुळे जीवनाचा दर्जा (quality of life) सुधारतो.
· औषधांचेप्रमाण आणि पर्यायाने त्यांचे साईड इफेक्ट्स देखील कमी होतात.
मी DBSसाठी एक चांगला उमेदवार आहे का?
तुमच्यासाठी डीबीएस योग्य आहे हे जाणण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे अशी आहेत:
· तुम्हाला Parkinson होऊन आता ४-५ वर्षाहून अधिक वर्ष झाली आहेत.
· तुम्हाला लिवोडोपा ह्या औषधाने आधी चांगला फायदा झाला पण आता औषध जास्त वेळ काम करत नाही, औषधांचे प्रमाण वाढले आहे किंवा औषध आता सारखे-सारखे घ्यावे लागते.
· औषधामुळे आता साईड इफेक्ट्स होत आहेत.
· जर तुम्ही शास्त्रक्रियेकडून वाजवी अपेक्षा (reasonable expectations) ठेवू शकत असाल तर (प्रश्न ३ आणि ४ बघा.).
डीबीएसचा फायदा मला केव्हा नाही?
· जर तुमचे पार्किन्सनचे निदान पक्के नाही.
· जर तुमच्या स्मरणशक्ती, आकलनशक्ती किंवा अन्य मानसिक कार्यक्षमतेमध्ये घट झाली आहे.
· जर आपण वैद्यकीय किंवा शारीरिकदृष्ट्या शास्त्रक्रियेकरिता तंदुरुस्त नाही आहात.
डीबीएस शस्त्रक्रियेचे धोके काय आहेत?
डीबीएस सुरक्षित आणि प्रभावी आहे. परंतु, इतर कोणत्याही शास्त्रक्रियेप्रमाणेच, ह्यातदेखील देखील जोखीम आहे आणि संभाव्य दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ: वेदना, संसर्ग, मेंदूमध्ये रक्तस्त्राव, पक्षाघात, नैराश्य, डिव्हाइसशी संबंधित गुंतागुंत, इतर वैद्यकीय समस्या, इत्यादी.
डीबीएस करण्याचा निर्णय घेतल्यास मला काय करावे लागेल?
तुम्हाला नयूरॉलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जन ह्यांना भेटावे लागेल. डीबीस तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरल्यास तुम्हाला प्रथम काही चाचण्या सांगितल्या जातील तसेच न्यूरोसायकोलॉजिस्टकडून मानसिक कार्यक्षमतेचं मूल्यांकन करावे लागेल. भूलतज्ज्ञांना भेटून शस्त्रक्रियेसाठी तुम्ही तंदुरुस्त आहात की नाही ह्याचे मूल्यांकन होईल. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर आपण शस्त्रक्रियेसाठी तयार आहात.
Copyright: Dr Bhushan Mishal. 2022